- घराबाहेर पडताना खबरदारी घ्या…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ ऑक्टोबर २०२२) :- पिंपरी चिंचवडसह पुण्यात पुढील ३ ते ४ तासांत विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह आणि काही क्षणात जोरदार, सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी पडण्याची शक्यता आहे. घराबाहेर पडताना खबरदारी घ्या, असे आवाहन भारतीय हवामान विभागाने वर्तविले आहे.
अरबी समुद्रातून येणारे मोठ्या प्रमाणावरील बाष्प आणि स्थानिक स्थितीमुळे शहरात पावसाचा जोर वाढला आहे. कमी वेळेत अधिक तीव्रता आणि मोठ्या कालावधीतील जलधारा जमिनीवर कोसळत जलप्रलय माजवत आहेत.
पिंपरी चिंचवड शहरात विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह सोमवारी रात्री तुफान पाउस झाला. रस्त्यांना नद्यांचे स्वरूप प्राप्त झाले होते. घरे, सोसायट्यांमध्ये पाणी शिरले. शहरात तब्बल १०४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती. आणखी दोन दिवस पावसाची शक्यता आहे.


















