न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ ऑक्टोबर २०२२) :- ऑनलाईन ओ.एल.एक्स अॅपच्या माध्यामातुन इंडिगो एअरलाईन कंपनीत नोकरी लावुन देण्याचे आरोपीने फिर्यादी यांना आमिष दाखवले. त्यासाठी इंडिगो इम्पलॉईचे हरवलेले आय.डी. कार्ड दाखवले. अकरा हजार पाचशे रुपये अकाऊंटवर पाठवण्यास भाग पाडुन फिर्यादीचा विश्वासघात करीत आर्थिक फसवणुक केली.
हा प्रकार (दि.२९/०९/२०२०) पासुन (दि. ०१/१०/२०२२) रोजी वारंवार फोन करुन ऑनलाईन ओ.एल.एक्स अॅपच्या माध्यमातुन घडला. महिला फिर्यादी यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी आरोपी मो.नंबर ९४७८३१७८३०, ९७१८७४५९७५, अनोळखी महिला, फेडरल बँक अकाऊंट धारक अनिलकुमार यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
















