न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ ऑक्टोबर २०२२) :- फिर्यादी हे स्विफ्ट गाडीमधुन घरी जात असताना फिर्यादीच्या तोंड ओळखीच्या आरोपीने त्याची चारचाकी आय २० गाडी आडवी लावली होती. फिर्यादीने गाडी बाजुला घेण्यास सांगितले असता आरोपीने चिडुन जावुन ” मीच इथला भाई आहे ” असे म्हणत आरोपीने त्याच्या भावाला बोलावुन घेत फिर्यादी यांना मारहाण केली. दुसऱ्या आरोपीने त्याच्या हातामध्ये असलेल्या कोयत्याने फिर्यादीच्या डोक्यावर मारण्यासाठी उगारला. परंतु ते बाजुला झाल्याने तो कपाळाला लागला व फिर्यादी जखमी झाले. दुसऱ्या आरोपीने कोयता मारुन फिर्यादीला जखमी केले. फिर्यादी खाली पडले असता दुसऱ्या आरोपीच्या मित्राने लाथाबुक्कांनी त्यांना मारहाण केली.
ही घटना (दि. १७) रोजी रात्री दीड वाजत पाण्याच्या टाकीच्या गेटजवळ, काळाखडक, वाकड येथे घडली. फिर्यादी संदिप उर्फ बाळु शांताराम भोसले (वय ३२ वर्षे, रा. तुळजाभवानी मंदिराशेजारी, काळाखडक, वाकड, मुळगाव बालेवाडी गाव ता. मुळशी) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
आरोपी राहुल विलास चव्हाण (वय २९ वर्षे, रा. कि इन हॉटेलजवळ, काळाखडक, वाकड), गणेश विलास चव्हाण (वय २५ वर्षे), दादा गंगावणे (वय २५ वर्षे, (पुर्ण नाव माहीत नाही) यांच्यावर वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
















