- एकाची लाखोंची फसवणूक; पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ ऑक्टोबर २०२२) :- मारुंजीतील कोलते पाटील डेव्हलपर्सचे आर.सी.सी कन्ट्रक्शनचे काम मिळाले आहे. त्यासाठी पैशाची गरज आहे. तु पैसे गुंतवले तर तु केलेला संपुर्ण खर्च व एकुण वर्कऑर्डरच्या २० टक्के पैसे देईन, असे आश्वासन आरोपीने फिर्यादीला दिले. फिर्यादीने गुंतवणुकीपोटी इंडसंड बँक खाते क्र. १५७३५००००३७९ व माधवी टेलीकॉम प्रा.लि.च्या बँक खात्यातुन आरोपीच्या पत्नीच्या माही इंजिनीयर्स ॲन्ड कॉन्ट्रॅक्टर्स व आरोपीच्या बँक खात्यात २१,८१,००० पाठविले. तसेच माधवी टेलीकॉमच्या बँक खात्यातुन माही इंजिनीयर्स ॲन्ड कॉन्ट्रॅक्टर्सला मटेरीयलसाठी ७,८६,३८२ रूपये पाठविले. फिर्यादीने इतर व्यक्तींकडुन (पुरूषोत्तम वाकळे, अजय गिधाडे, ज्ञानेश्वर वाकळे) यांच्या बँक खात्यातुन ऑनलाईन स्वरूपात लेबर पेमेंट व इतर वाहतुक खर्चासाठी वेळोवेळी १०,६७,७५९ रूपये पाठविले. तसेच ऑनलाईन व रोख स्वरूपात केलेला इतर खर्च रक्कम रूपये १०,३४,९७३ असे एकुण ५०,७०,११४ रूपये फिर्यादी यांनी आरोपीच्या माही इंजिनीयर्स ॲन्ड कॉन्ट्रॅक्टर्स या कंपनीत गुंतवणुक केली.
आरोपीकडुन फिर्यादीच्या माधवी टेलीकॉमच्या बँक खात्यात १६,०५,४०६ एवढी रक्कम परत आली. फिर्यादीने गुंतवणुक केलेल्या पैशापैकी रक्कम रूपये ३४,६४,७०८ व वर्क ऑर्डर रक्कम रूपये १०,००६,२७९ रूपयांपैकी एकुण ६० टक्के काम पुर्ण झाले असुन २० टक्के नफा स्वरूपात मिळणारी रक्कम १२,००७५३ असे एकुण ४६,६५,४६१ रूपये न देता फिर्यादीची आरोपीने आर्थिक फसवणुक केली आहे.
हा प्रकार नोव्हेंबर २०२१ ते ऑगस्ट २०२२ दरम्यान मारुंजीतील कोलते पाटील कंस्ट्रक्शन कंपनीच्या लाईफ रिपब्लीक या साईटवर घडला. फिर्यादी शिवाजी मुरधीलर वाकळे (वय ३५, रा. कान्हे, वडगांव मावळ, मुळगाव येवरी, ता जळकोट, जि लातुर) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. आरोपी सिध्देश्वर दत्तात्रय वाकळे (वय ३९, रा. सर्वे नं. ३६/२, न-हे-धायरी रोड, फलॅट नं. ३३, सिध्दी विहार सोसायटी, नऱ्हेगाव, हवेली पुणे, मुळगावं रा. येवरी, ता जळकोट, जि लातुर) याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


















