- दिनेश यादव यांची पालिकेच्या विद्युत विभागाकडे मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ ऑक्टोबर २०२२) :- प्रभाग क्रमांक २ कुदळवाडी येथील सर्व मंदिरासमोर दिपमाळ पोल बसविण्यात यावेत, अशी मागणी मा. स्वीकृत सदस्य दिनेश यादव यांनी पालिकेच्या क क्षेत्रीय कार्यालय, विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
कुदळवाडीतील श्री भैरवनाथ मंदिर, श्री माताजी मंदिर, श्री विठ्ठल मंदिर, श्री घुण्येश्वर मंदिर, गणपती मंदिर बालघरे वस्ती व पवारवस्ती, विरोबा मंदिर, महादेव मंदिर, अजिनी माता या मंदिरांसमोर दिपमाळ पोल बसविल्यामुळे मंदिर परिसर उजळून निघेल. प्रसन्न वातावरण तयार करण्यासाठी मदत होईल, असे यादव यांनी निवेदनात म्हटले आहे.
















