- महापालिका निवडणुका अद्यापही संभ्रमातच…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
नवी दिल्ली (दि. १९ ऑक्टोबर २०२२) :- सर्वोच्च न्यायालयात आज महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थासंदर्भात महत्त्वपूर्ण सुनावणी पार पडली आहे. मुंबई महापालिका प्रभाग रचनेबाबत सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी वेळी प्रभाग रचनेबाबत हस्तक्षेप करण्यास न्यायालयाने नकार दिला आहे. याबाबत याचिकाकर्त्यांना मुंबई हायकोर्टात जाण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.
मुंबई महापालिकेसह राज्यातील इतर महापालिकांच्या निवडणुकी कधी होणार याची स्पष्टता या निर्णयानंतर येणार आहे. राज्य सरकारने केलेल्या प्रभागरचनेतील बदलाच्या निर्णयला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. परंतु सुप्रीम कोर्टाने संबंधित प्रकरणे मुंबई उच्च न्यायालयात नेण्यास सांगितले. मुंबई महापालिका आणि इतर महापालिकांच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर करण्यास उशीर होत असून, या मुद्द्यावर निर्णय लवकर होण्याची प्रतीक्षा आहे.
मुंबईसह २३ महानगरपालिका, २५ जिल्हा परिषदा, २८४ पंचायत समित्या, २०७ नगरपालिका, १३ नगर पंचायतींच्या निवडणुकांच्या प्रक्रियेसंदर्भात दाखल याचिकांवर आज सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप करण्यास नकार दिला.


















