- केमिस्ट असोसिएशनचे विवेक तापकीर यांची अन्न व औषध प्रशासनाकडे मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ ऑक्टोबर २०२२) :- ॲानलाईन औषध विक्रीला कोणतीही परवानगी नसताना मोठया प्रमाणावर औषध विक्री होत आहे. परराज्यातून येणारी औषधे कोणत्या प्रकारची आहेत, ती योग्य आहेत की अयोग्य, गुणवत्ता, मूळ आहेत की नक्कल, गर्भपाताची औषधे, नशेचे औषधे, झोपेच्या गोळ्या या सर्व थेट रुग्णांच्या हाती पडतात, त्याही मोठ्या सवलतीच्या दरात. विविध प्रलोभनांना रुग्ण बळी पडतात. तिथे फार्मसिस्ट उपस्थित आहे की नाही हा विषय गौणच?
याउपर स्थानिक औषध विक्रेता हा फार्मासिस्टच्या उपस्थितीमध्ये सर्व नियंमांचे पालन करून औषध विक्री करतो. बाजारांमध्ये परारज्यातून येणारी अनेक औषधे ही बनावटीची असू शकतात. डिजिटल इंडीयामध्ये अनधिकृत ॲानलाईन औषध विक्री सोईस्कररित्या रूग्णास कधी ॲाफलाईन करेल हे सांगता येत नाही. अन्न व औषध प्रशासनाने योग्य ते लक्ष देत परराज्यातून येणाऱ्या औषधांवर नियंत्रण ठेवून होणारी हानी टाळावी, असे निवेदन केमिस्ट असोसिएशन ॲाफ पुणे डिस्ट्रीक्टचे उपाध्यक्ष तथा काळेवाडी रहाटणी केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष विवेक मल्हारी तापकीर यांनी राज्याचे अन्न व औषध प्रशासन आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
















