न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ ऑक्टोबर २०२२) :- फेसबुकद्वारे आरोपीने फिर्यादीच्या बहिणीला व्हीडीओ कॉल केला. फिर्यादीने आरोपीला खडसावले. त्याचा राग मनात धरुन फिर्यादी साई चौकात नाष्टा करीत असताना आरोपीने त्याच्या साथीदारांसह मिळुन फिर्यादीला धारदार चाकु दाखवुन जिवे मारण्याची धमकी दिली.
शिवीगाळ करुन लाथा-बुक्क्यांनी व लाकडी दांडक्यांनी मारहाण केली. फिर्यादीला सोडविण्याकरीता आलेल्या लोकांना धारदार चाकुचा धाक दाखवत ” जर सोडविण्यास आला तर मारुन टाकतो ” असे म्हणुत सामाजिक शांतेतेचा भंग केला व दहशतीचे वातावरण निर्माण केले.
ही घटना (दि. १३) रोजी साडेचार वाजता पिंपरीतील साई चौक येथील जय अंबे मोबाईल शॉप समोर घडली. फिर्यादी प्रतिक जयराज पालवे (वय ३१ वर्षे, रा. सी-९/२२, एक्सटेंशन १, वैष्णव देवी मंदिराजवळ, पिंपरी कॅम्प, पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
आरोपी विशाल अरनॉल्ड (पुर्ण नाव पत्ता माहिती नाही वय ३५ वर्षे अंदाजे), रोहित वाघमारे (पुर्ण नाव पत्ता माहिती नाही वय २८ वर्षे अंदाजे, रा मिलींद नगर पिंपरी), मोनु भोत (पुर्ण नाव पत्ता माहिती नाही वय २४ वर्षे अंदाजे, रा. कैलाश नगर डिलक्स टॉकीजच्या मागे पिंपरी), शानु भोत (पुर्ण नाव पत्ता माहिती नाही वय २६ वर्षे रा. कैलाश नगर पिंपरी), सनि भोत (पुर्ण नाव पत्ता माहिती नाही वय २८ वर्षे, रा. कैलाश नगर पिंपरी), नितीन कागदा (पुर्ण नाव पत्ता माहिती नाही वय ३५ वर्षे रा. साईनाथ सोसायटी, पिंपरी), दिलीप कसबे (पुर्ण नाव पत्ता माहिती नाही २७ वर्षे, रा. मिलींदनगर पिंपरी), रोहन खंडागळे पूर्ण नाव पत्ता माहिती नाही वय २४ वर्षे अंदाजे रा. मिलींदनगर पिंपरी) यांच्यावर पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपरी पोलीस पुढील तपास करीत आहेत.
















