न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ ऑक्टोबर २०२२) :- पिंपरी-चिंचवड शहरात अनधिकृतपणे फ्लेक्स लावणाऱ्यांची संख्या वाढत आहे. वाढदिवसांच्या शुभेच्छा, विविध पदांवर झालेली निवड, नेत्यांचे स्वागत करण्यासाठी फ्लेक्स लावले जात आहेत.
त्यामुळे शहराच्या विद्रुपीकरणात भर पडत आहे. अशा अनधिकृत फ्लेक्सवर कारवाई करावी, अशी मागणी शहरातील सामाजिक कार्यकर्ते करत आहेत.
महापालिकेच्या वतीने देखील अशा फ्लेक्सवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार रहाटणी परिसरात क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने विजेच्या पोलवर लावण्यात आलेले फ्लेक्स काढण्यात आले. सुरक्षा रक्षकांच्या उपस्थितीत फ्लेक्स हटविण्यात आले.
















