- खराबवाडीतील घटना; कंपनीच्या मालकावर गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ ऑक्टोबर २०२२) :- डेकॉन इंडीया प्लॅस्टिक प्रा.लि. कंपनीचे एअरविंड नावाचा माल भरलेले तीन कंटेनर खराबवाडी येथुन चेक प्रजासत्ताक येथे पोहच करण्यासाठी आरोपींनी फिर्यादी यांना १७,९४,४५२ रुपयांचे सरचार्जेस कोटेशन दिले.
फिर्यादीकडुन २,३३,२१,१२० किंमतीचे माल भरलेले तीन कंटेनर विश्वासाने ताब्यात घेतले. परंतु, फिर्यादीच्या कंपनीस अतिरिक्त सरचार्जेस बाबत स्पष्ट माहिती न देता मुळ सर्व्हिस चार्ज स्विकारुन १७,९४,४५२ ऐवजी ४७,४८,७६० रुपये अशी २९,५४,३०८ रुपयांची जादा रक्कम अतिरिक्त सरचार्जेस म्हणुन खंडणी स्वरुपात आरोपींनी मागणी केली आहे. तसेच फिर्यादीने आरोपींच्या सांगण्याप्रमाणे जादा रक्कम दिली नाही, तर ते फिर्यादीचा माल असणारे कंटेनर पोर्टमधुन फिर्यादींच्या कंपनीचे गिर्हाईक यांच्या पर्यत पोहच करणार नाहीत, असे म्हणत आहेत.
हा प्रकार खराबवाडी, वाघजाई नगर येथील डेकॉन इंडीया प्लॅस्टिक प्रा.लि. कंपनीत घडला. फिर्यादी गणेश शंकरराव कदम (वय ३९ वर्ष, रा. रिव्हर ब्रिज सोसायटी, मोशी टोलनाका जवळ, मोशी) यांनी चाकण (म्हाळुंगे) पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार आरोपी प्रशांत आनंद शेटे, (राउंद क्लॉक कंपनीचे मालक), सॅमुवेल जबराज राजुनाडार (प्रोजेक्ट मॅनेजर), राउंद क्लॉक कंपनीचे इतर पदाधिकारी यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. चाकण (म्हाळुंगे) पोलीस पुढील तपास करीत आहेत.


















