न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० ऑक्टोबर २०२२) :- टिव्हीएस ज्युपीटर मोपेडे दुचाकीवरून फिर्यादी व त्यांचे मित्र (एम.एच.२५ ए.टी ८०३२) घरी जात होते. दरम्यान पाठीमागुन नाशिक फाट्याकडून जाणाऱ्या दुचाकीस्वार आरोपीच्या दुचाकीने भरधाव वेगात, बेदरकारपणे दुचाकी चालवत फिर्यादीचे मित्र चालवित असलेल्या दुचाकीच्या उजव्या बाजुने हॅन्डलला धडक दिली. त्यात दोघेही खाली पडले. फिर्यादीच्या उजव्या बाजुच्या गुडघ्याला मार लागुन ते किरकोळ जखमी झाले. तर त्यांच्या मागून आलेल्या कारच्या चाकाखाली मित्राचे डोक आल्याने ते गंभीर जखमी झाले. कारचालक अपघातास्थळी न थांबता तसाच पुढे निघुन गेला. उपचारा दरम्यान फिर्यादीच्या मित्राचा मृत्यू झाला.
हा प्रकार (दि. १८) रोजी रात्री १०:३० च्या सुमारास पुणे-नाशिक रस्ता, भोसरीगाव, हह्युंदाई कंपनीच्या मागील बाजुस असलेल्या विहीरीजवळ घडला. फिर्यादी गोविंद सोपान नागरगोजे (वय २८ वर्ष, रा. मोरया कॉलनी, मंजुळाबाई शाळेसमोर, दिघी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
आरोपी मोटार सायकल वरील चालक (सुभाष नगरकर रा. मोशी), अनोळखी कारवरील अनोळखी चालक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भोसरी पोलीस पुढील तपास करीत आहेत.


















