न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० ऑक्टोबर २०२२) :- रहाटणीतील क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले एज्युकेशन फाउंडेशन संचालित न्यू सिटी प्राईड इंग्लिश मिडिअम स्कूल येथे ईको फ्रेंडली दिवाळी साजरी करण्यात आली.
संस्थेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार व प्रमुख पाहुणे शर्मिष्ठा गायकवाड, पृथ्वीराज यादव, ओंकार पाटील हे उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सरस्वती पूजन करण्यात आले.
शिक्षिका प्रियांका शहाबादे यांनी सरस्वती पूजन केले. सातवीच्या विद्यार्थांनी गीत गायन तर पाचवीच्या विद्यार्थांनी हिंदी गाण्यावर नृत्य सादर केले. सरला शिंदे यांनी दिवाळीबद्दल माहिती सांगितली. अरुण चाबुकस्वार यांनी विद्यार्थाना दिवाळीमध्ये प्लास्टिक ऑफ पॅरिसचे किल्ले न वापरता मातीचे किल्ले बनवा तसेच इको फ्रेंडली दिवाळी साजरी करण्याचे आवाहन करीत विद्यार्थाना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. सातवीच्या ओम काळे या विद्यार्थाने आभार तर शिक्षिका माधुरी पाटील यांनी सूत्र संचालन केले.















