न्यूज पीसीएमसी नेटवर्क
निगडी (दि. २५ फेब्रु.) :- इंडियन बिझनेस क्लबच्या (आयबीएस) वतीने आयोजित केलेल्या आयबीएस प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत वसंत जाग्वार संघाने १४ धावांनी विजेतेपद पटकावले. तर जय भवानी संघ उप विजेतेपद ठरला. अंतिम सामना वसंत जाग्वार संघ आणि जय भवानी संघ यांच्यात रंगला.
या टूर्नामेंटचे उदघाटन महापौर राहुल जाधव यांच्या हस्ते मदनलाल धिंग्रा मैदानावर करण्यात आले होते. बक्षीस वितरण प्रसंगी राजस्थानचे माजी रणजीपटू प्रशिक्षक कैलास गट्टाणी, वसंत ग्रूपचे अध्यक्ष प्रेमचंद मित्तल, उद्योजक रंगनाथ गोडगे, आयबीएसचे संचालक अनिल मित्तल, दिलीप मॅथ्यू, अभय खिंवसरा, क्रीडा संचालक कैलाश पारिक, कृष्णकुमार पारिक, नितेश मकवाना, प्रयोजक अरुण मित्तल, सुनील मित्तल आदि उपस्थित होते.
यावेळी अभिषेक दाणी उत्कृष्ट फलंदाज, ओमप्रकाश शर्मा उत्कृष्ट झेलपटू, अश्मित पारिक उत्कृष्ट यष्टीरक्षक, वैभव बोरा उत्कृष्ट गोलंदाज, अविनाश मांडले यांना उत्कृष्ट खेळाडू म्हणून सन्मानित केले. फेयर गुड स्पोर्ट्समनशिप म्हणून दुर्गा फायटर संघाचा गौरव केला.
या स्पर्धेत १० संघ सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार अभय खिंवसरा यांनी मानले. समालोचन राज सायलू यांनी केले.











