न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ फेब्रु.) :- शिवशाही व्यापारी संघाची रविवार (दि. २४) रोजी हॉटेल ब्रिज पॉईट पुनावळे या ठिकाणी प्रदेश अध्यक्ष युवराज दाखले, प्रदेश सचिव गणेश आहेर यांच्या प्रमुख उपस्थित बैठक पार पडली.
या बैठकीत शिवशाही व्यापारी संघ चिंचवड विधानसभा अध्यक्ष गणेश पाडुळे व पिंपरी-चिंचवड शहर अध्यक्ष विशाल बाविस्कर यांच्या अनुमोदनाने चिंचवड विधानसभा उपाध्यक्षपदी संदिप खुंटे यांची निवड करण्यात आली. व्यापारी वर्गाच्या तसेच सर्वसामान्य जनतेच्या सेवेसाठी कटिबद्द राहण्याच्या यावेळी त्यांना देण्यात सुचना दिल्या.
यावेळी प्रदेश अध्यक्ष युवराज दाखले, प्रदेश सचिव गणेश आहेर, गोरख पाटील, मारूती मस्के, आशिष वाळके, गणेश पाडुळे, भरत इंगळे, बाळासाहेब गायकवाड, युवासेनेचे सागर शिंदे, महीला आघाडी प्रदेश उपाध्यक्षा भाग्यश्री मस्के, पुणे शहर अध्यक्षा सुनिता खंडाळकर, रत्नप्रभा नवगिरे आदी उपस्थित होते.











