न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ ऑक्टोबर २०२२) :- जागेच्या वादातुन फिर्यादीच्या चुलत पुतण्याने साथीदारांसह फिर्यादी राहत असलेल्या घरी येऊन फिर्यादीला तसेच फिर्यादीचे चुलते, चुलत भाऊ व वडील यांना शिवीगाळ केली. फिर्यादी त्याना समजवण्यासाठी जात असताना आरोपीने फिर्यादीला जिवे ठार मारण्याच्या उददेशाने त्याच्याकडील पिस्तोलने फिर्यादीवर गोळी झाडली. ती फिर्यादीच्या हाताला घासुन गेली. फिर्यादी किरकोळ जखमी झाले.
त्यानंतर ते स्वतःला वाचवण्यासाठी पळुन घरात लपले असता आरोपीच्या साथीदारांनी फिर्यादीचे चलते, चुलत भाऊ व वडीलांवर गिलोरीने दगडे मारली.आरोपीने फिर्यादी लपलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये गोळी झाडली. यावेळी आरोपी ” आता वाचलास तूला माहित आहे का माझ्यावर किती गुन्हे आहेत, पून्हा सोडणार नाही ” असे फिर्यादीला म्हणाला.
हा प्रकार (दि. २०) रोजी दहाच्या सुमारास ब्लू डॉट चे बाली, शिव कॉलनी, नेरे दत्तवाडी, ता. मुळशी येथे घडला. फिर्यादी येशू लूटेरा मारवाडी (वय २८ वर्षे, रा. तू डॉटचे खाली, शिव कॉलनी, नेरे दत्तवाडी, ता. मुळशी, जि. पुणे) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आरोपी विकास राजपूत (रा. भोसले वस्ती माण), कार्तिक ठाकूर (रा. आकूर्डी), पृथ्वीराज राठोड (रा. चाकण), ज्ञानेश्वर राजपूत (रा. वाडेबोल्हाई पूणे- पूर्ण नाव पत्ता महित नाही) यांच्यावर गुन्हा दाखल करीत त्यांना अटक करण्यात आली आहे. हिंजवडी पोलीस पुढील तपास करीत आहेत.


















