- एकाची लाखाची फसवणूक; गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ ऑक्टोबर २०२२) :- क्वीकर वेबसाईटवर ब्रँडेड कंपनीचे लॅपटॉप स्वस्तात देण्याची जाहीरात देऊन फिर्यादी यांना आरोपीने वेळोवेळी व्हॉटसअॅप कॉल व मेसेज केला. त्यावरून वेळोवेळी पैशाची मागणी केली.
लॅपटॉप न पाठविता तसेच लॉयड सायबर सपोर्ट ८८ या वेबसाईटवरुन फसवणुक झालेली रक्कम परत मिळवुन देण्याचे आश्वासन दिले. वेळोवेळी वेगवेगळे चार्जेस सांगुन फिर्यादी यांची एकुण १,१८,००० रुपयांची फसवणुक केली आहे.
हा प्रकार (दि. १६.०७.२०२१ रोजी पासुन ते १९/१०/२०२२ रोजीपर्यंत) ऑनलाईन घडला. फिर्यादी प्रशांत प्रदिप धुमाळ (वय ३० वर्षे रा. प्लॉट नं. ५४ सेक्टर न. १९ कोयनानगर, चिखली रोड चिंचवड) यांनी चिखली पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी आरोपी मोबाईल नंबरवरील व्यक्तीवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
















