- पिंपळे निलख येथील गॅलेक्सी सलुनमधील घटना…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ ऑक्टोबर २०२२) :- हेअर ड्राय करण्यासाठी फिर्यादी आरोपीच्या दुकानात गेले. दुकानात लाईट नसल्याने दुकानातील एकाला फिर्यादीने काही करुन केस हेअर ड्राय कर, असे सांगितले. त्याचा आरोपीला राग आल्याने दोघांमध्ये वाद होऊन बाचाबाची झाली. आरोपीने शिवीगाळ करीत हातामध्ये असलेली केस कापायची कात्री फिर्यादीच्या डाव्या कानाला मारुन फिर्यादीला जखमी केले.
हा प्रकार (दि. २१) संध्याकाळी पावणेसहा वाजता गॅलेक्सी सलुन, पिंपळे निलख येथे घडला. फिर्यादी अनुज राहुल गायकवाड (वय १९ वर्षे, रा. संध्यानगरी, विशालनगर पिंपळे निलख) याने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
आरोपी सिराजुद्दीन कुतुबूद्दीन शेख (वय ३० वर्षे रा. हरिभाऊ साठे बिल्डींग, रुम नं. ४, हरि ओम डेअरी गल्लीमध्ये, पुजा सुपर मार्केटसमोर पिंपळे निलख) याच्यावर गुन्हा दाखल करीत पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. सांगवी पोलीस पुढील तपास करीत आहेत.