न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ ऑक्टोबर २०२२) :- पिंपरी येथील इंदिरा गांधी उड्डाणपुलावर भाटनगरवरून पिंपरीच्या दिशेला जाणार्या रस्त्यावर बाजूला टाटा सफारी कार पार्क केली होती. कार चालकाला जिम ला जायचे असल्याने त्याने कार चालू करताना चुकून ऍक्सेलेरेटर दाबला गेल्याने वेग वाढला व कार उड्डाणपुलाच्या कठड्याला धडकली.
सिमेंटचे जाड व मोठे कठडे असल्याने कार धडकून अडकली. हा अपघात आज सकाळी ७ ते ८ च्या दरम्यान व्यंकटेश मार्केट जवळ घडला होता. सुदैवाने यामध्ये कोणीही जखमी झालेले नाही. गाडीचे मोठे नुकसान झाले आहे.