न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १ नोव्हेंबर २०२२) :- फ्लॅटचा कडीकोयंडा तोडुन आतमध्ये प्रवेश करुन बेडरुममधील कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने व रोख रक्कम अज्ञात आरोपीने चोरुन नेली. फिर्यादी यांचे ३१.५ ग्रॅम वजनाचे २,३२,५०० रूपयांचे सोन्याचे दागिने व त्यांचे शेजारी मानसिंग शिवराम बर्गे वय ५१ वर्षे, यांचे २० ग्रॅम वजनाचे ६०,००० रूपयांचे सोन्याचे दागिने व २५,००० रूपये रोख रक्कम असे एकुण ३,१७,५००/- रूपयांचे दागिने व रोख रक्कम चोरीला गेली.
ही घटना (दि.२५/१०/२०२२) रोजी सकाळी ११ वा. पासुन ते (दि. २९/१०/२०२२) रोजी रात्री २.३० वा. पर्यंत फ्लॅट नं. ४ व ७, सर्व्हे नं. ६९/१ बी, साई अपार्टमेन्ट, परीस कॉलणी नं. १, तापकीरनगर, काळेवाडी येथे घडली.
फिर्यादी प्रकाश ज्ञानदेव माने (वय ५२ वर्षे, रा. फ्लॅटनं. ७, सर्व्हे नं. ६९/१ बी, साई अपार्टमेन्ट, परीस कॉलनी नं. १, तापकीरनगर, काळेवाडी) यांनी वाकड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात फिर्याद दिली असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. वाकड पोलीस पुढील तपास करीत आहेत.