न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १ नोव्हेंबर २०२२) :- घरामध्ये तंबाखुजन्य पान मसाला व तंबाखुची साठवणुक केली. पोलिसांना माहिती मिळताच साठवणूक केलेला १,९८,४०२ रूपयांचा प्रतिबंधित तंबाखुजन्य पदार्थ जप्त केला.
पोलिसांनी ही कारवाई (दि.३१/१०/२०२२) रोजी सकाळी ६.२० वा. चे दरम्यान रा. काशिद पार्क, मराठा हॉटेल जवळ, पिंपळे गुरव प के / ऑफ रविन्द्र विलास कशिद यांची रुम येथे केली.
फिर्यादी सांगवी पोलीस स्टेशनचे पोहवा महेश कारभळ यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून आरोपी सत्यनारायण रामकरण माली (वय ३७ वर्षे, रा. महाराष्ट्र कॉलनी, लेन नं. ०३, काशिद पार्क, पिंपळे गुरव के / ऑफ त्र्यंमक किसन भापकर यांचे रुममध्ये भाडयाने, मुळ रा. राजस्थान) याच्यावर गुन्हा दाखल करत त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. सांगवी पोलीस पुढील तपास करीत आहेत.