- सिध्दी ग्रुप, वीर विशाल संघ, संजय छाजेड, नवनीत पितळे पुरस्काराचे मानकरी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १ नोव्हेंबर २०२२) :- महर्षि आनंद सेवा भक्ती प्रतिष्ठानचा यंदाचा ” महर्षि आनंद सेवा ” पुरस्कार सोहळा केडगाव जैन स्थानकात नुकताच संपन्न झाला. आनंदशिष्यरत्न, प्रवचन प्रभाकर प पू प्रशांतॠषिजी म सा व मधुर वक्ता प पू विजयस्मिताजी म सा यांच्या दीक्षादिनाचे औचित्य साधून हा पुरस्कार सोहळा त्यांच्या सान्निध्यात घेण्यात आला.
प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. अशोककुमार पगारिया, कार्याध्यक्ष संदीप फुलफगर, विश्वस्त अमित नहार, श्रेयास बागमार, जवाहरलाल बोथरा, विजया बोथरा तसेच श्री संघाचे उपाध्यक्ष संतोष शेलोत, अभय पितळे यांच्या हस्ते मान्यवरांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
पुण्यातील सिध्दी ग्रूपला रक्तदान शिबिर क्षेत्रातील, चिंचवडगाव येथील वीर विशाल संघाला समाजसेवा क्षेत्रातील, मांजरी बु. येथील संजय छाजेड यांना संतसेवा क्षेत्रातील तसेच केडगाव येथील नवनीत पितळे यांना धार्मिक क्षेत्रातील ” महर्षि आनंद सेवा पुरस्कार ” प्रदान करण्यात आला.
सिध्दी ग्रूपच्या वतीने विश्वस्त मुकेश छाजेड तसेच वीर विशाल संघाच्या वतीने अध्यक्ष मयुर शिंगवी, नंदकुमार लुनावत आणि इतर कार्यकर्त्यांनी पुरस्कार स्विकारला. प्रा. पगारिया यांनी आपल्या प्रास्ताविकात प्रतिष्ठानच्या विविध उपक्रमांची माहिती दिली व पुरस्कारार्थीच्या कार्याचा परिचय करुन दिला.
















