न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २ नोव्हेंबर २०२२) :- दोन लाखांची मारूती सुझुकी सुपरकॅरी सीएनजी फोर व्हिलर गाडी (एम/१४/जेएल/२०१७) ही लॉक लावून पार्क करीत ड्रायव्हर कंपनीत झोपला होता. ती गाडी कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरून नेली आहे.
हा प्रकार (दि. ३१/१०/२०२२ रोजी साडेदहा वा. ते ०१/११/२०२२ रोजी आठ वा. चे दरम्यान मिंडा लाईटींग कंपनी, महाळुंगे येथील कंपनीच्या बाहेर, रस्त्याच्या कडेला घडली.
फिर्यादी विक्रम दिलीप बोत्रे (वय ३० वर्ष रा. येलवाडी, संत तुकारामनगर, जुना टोल नाक्या जवळ) यांनी चाकण (महाळुंगे) पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. चाकण (महाळुंगे) पोलीस पुढील तपास करीत आहेत.