न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २ नोव्हेंबर २०२२) :- कर्मचारी भविष्य निधी संघटनेच्या (EPFO) पिंपरी येथे पुणे क्षेत्रीय कार्यालयाची केंद्रीय राज्य मंत्री भूपेंद्र यादव यांनी मंगळवारी सकाळी नवी दिल्ली येथून ऑनलाईन पद्धतीने पायाभरणी केली.
त्यावेळी भाजपा शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे, आरती अहुजा (आय.ए.एस, सचिव, कामगार आणि रोजगार मंत्रालय, केंद्र सरकार) व नीलम शमी राव (आय.ए.एस, केंद्रीय भविष्य निर्वाह निधी आयुक्त), एम.एस.के.व्ही.व्ही सत्यनारायण, (अतिरिक्त केंद्रीय भविष्य निधी आयुक्त, पुणे झोन), अमित वशिष्ठ (क्षेत्रीय भविष्य निधी, आयुक्त १ ), के रवींद्र कुमार (क्षेत्रीय भविष्य निधी आयुक्त १), मिलिंद पल्हाडे (व्यवस्थापक, हिंदुस्तान एंटीबायोटिक्स लिमिटेड), मनोज माने (क्षेत्रीय भविष्य निधी आयुक्त २), आदित्य तलवारे (क्षेत्रीय भविष्या निधी आयुक्त २) व भविष्य निधी संघटनेचे इतर कर्मचारी आणि अधिकारी उपस्थित होते.
केंद्रीय रसायन आणि खते मंत्रालयाच्या हिंदुस्तान एंटीबायोटिक्स लिमिटेडकडून (एच.ए.एल) ३.५ एकर जमीन पुणे क्षेत्रीय कार्यालय इमारत आणि निवासी क्वार्टर्स बांधण्यासाठी घेण्यात आली आहे. केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभाग (सी पी डब्ल्यू डी) यांनी नियोजित कार्यालय इमारतीचे डिझाईन तयार केले आहे. या इमारतीत सात मजले आणि निवासी क्वार्टर्स असतील. त्यांचा एकूण बिल्टअप एरिया ३१,७७०.४३ चौमी असेल. ऊर्जेची बचत करण्यासाठी ग्रीन बिल्डिंग नियम पाळले जातील. दिव्यांगांच्या सोयीसाठी एक्सेस इंडिया स्कीम नियम पाळले जातील.


















