न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २ नोव्हेंबर २०२२) :- स्वारगेट येथून स्वारगेट बस स्टॉप ते पिंपळे गुरव येथील रामकृष्ण मंगल कार्यालय बसने प्रवास करीत असताना फिर्यादीच्या बॅगमधील २,७५,००० रु. किं.चे साडेपाच तोळयाचे सोन्याचे दागिने कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेले आहेत.
ही घटना (दि. ३०/१०/२०२२) रोजी सव्वातीन ते साडेचारच्या बस प्रवासा दरम्यान घडली. ४१ वर्षीय फिर्यादी महिलेने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. सांगवी पोलीस पुढील तपास करीत आहेत.