न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २ नोव्हेंबर २०२२) :- शासनाने प्रतिबंधीत केलेला तंबाखूजन्य / गुटखा / सुगंधी सुपारी विक्री करण्यासाठी जवळ बाळगला. याची माहिती अंमली पदार्थ विरोधी पथक, गुन्हे शाखा यांना मिळाली. पोलिसांनी कारवाई करीत आरोपीला ताब्यात घेतले.
पोलिसांनी खोलीत तसेच खोली समोरील अॅक्टीवा गाडी (एमएच १४ जीएक्स ४१६७) मध्ये व बिल्डींग समोरील मोकळया जागेत पार्क केलेल्या सॅन्ट्रो कार (एमएच १२ वायए ५४७५) व इको कार (एमएच ०४ ईक्यु ०९०३) मधील तंबाखूजन्य / गुटखा / सुगंधी सुपारी असा एकूण ११,१७,६५२ रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. हा माल आरोपींनी एकाकडुन आणला असल्याचे आरोपींनी सांगितले.
ही घटना (दि. १) रोजी १२:२५ च्या सुमारास बाळ गोपाळ विदयानिकेतन शाळा रोड, गणपती मंदिराच्या पाठीमागील खोलीत व कृष्णकुंज बिल्डींग समोरील मोकळया जागेत, पिंपरीगाव, पिंपरी येथे घडला. फिर्यादी शहर गुन्हे शाखा अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस शिपाई सदानंद विजय रुद्राक्षे यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी आरोपी महावीर लिंबाराम भाटी (वय २५ वर्षे, रा. फ्लॅट नं. २, यमुना बिल्डींग, स्मशानभूमी जवळ, पिंपरीगाव, मुळ रा. रियाबडी, ता. रियाबडी, जि. नागोर, राजस्थान), सतिश माळी (पुर्ण नाव माहीत नाही रा. सांगवी), धनसाराम (पुर्ण नाव पत्ता माहीत नाही रा. वाघोली) यांच्यावर गुन्हा दाखल करीत एकाला ताब्यात घेतले आहे. पिंपरी पोलीस पुढील तपास करीत आहेत.