न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २ नोव्हेंबर २०२२) :- पांढऱ्या रंगाच्या पिशवीमध्ये गांजा जवळ बाळगल्याची माहिती पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली. पोलिसांनी कारवाई करीत १६,३५० रुपये किंमतीचा ६५४ ग्रॅम वजनाचा गांजा, २५,००० रुपये किंमतीचे दोन मोबाईल व ४५,००० रुपये किंमतीची दुचाकी गाडी असा एकुण ८६,३५० रुपये किंमतीचा माल जप्त केला.
ही करवाई (दि. १) रोजी ४.१० वा. च्या सुमारास हिंजवडी फेज ३ येथील फाऊंटन मार्केट येथील एम.डी. अली मटन व फिश शॉप नावाचे दुकाना समोरील जागेमध्ये केली. फिर्यादी पोलीस शिपाई प्रसाद जंगीलवाड यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी आरोपी अशोक राजेंद्र तेलंग (वय ३५ वर्षे, रा चांदे फाटा, महेश पारखी याचे भाडयाचे घरामध्ये, हिंजवडी, मुळ रा. आलशी तुगाव ता भालकी, जि बिदर राज्य कर्नाटक), आशादुल्ला अली अब्दुल कासिम (वय २६ वर्षे, रा. गवारवाडी, संदिप गवारे यांचे भाडयाचे घरामध्ये, हिंजवडी फेज ३, हिंजवडी, मुळ गाव ठेकराजुली, तहसिल सुनितपुर, राज्य आसाम) यांच्यावर गुन्हा दाखल करीत आरोपींना ताब्यात घेतले आहे. हिंजवडी पोलीस पुढील तपास करीत आहेत.