न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ५ नोव्हेंबर २०२२) :- कॉलेजला जाता-येता आरोपी फिर्यादीच्या घरासमोर, गल्लीत पाठलाग करून ” तु मला आवडते, तु माझ्याशी बोल, तु जर नाही बोलली तर मी आत्महत्या करेन ” असे म्हणाला. त्यानंतर इतरत्र गाठून ” तु मला हो म्हणती का नाही ते मला दोन ते तीन दिवसात सांग, नाही सांगितले की, मी आत्महत्या करेन ” अशी धमकी देत निघून गेला.
ही घटना (सप्टेंबर २०२१ पासून ०३/११/२०२२ ते ०४/११/२०२२ दरम्यान आठ वाचे सुमारास फिर्यादीच्या राहत्या घराच्या परीसरात घडली. पीडीत १५ वर्षीय फिर्यादी मुलीने दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
पोलिसांनी आरोपी आकाश नारायण जाधव (वय २० वर्षे, रा. दिघी) याच्यावर गुन्हा दाखल करीत त्याला अटक केली आहे. दिघी पोलीस पुढील तपास करीत आहेत.


















