न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ५ नोव्हेंबर २०२२) :- घरी असताना आरोपीने स्वतःच्या मोबाईलवरुन फिर्यादीच्या मोबईलवर फिर्यादीची मुलगी व आरोपी यांचा न्युड फोटो आणि फिर्यादीच्या मुलीचा कपडे न घातलेला रेकॉर्ड केलेला व्हिडीओ पाठवला. तीच्या मैत्रिणी व मित्र यांच्या मोबाईल व्हाटसअॅपवर व्हायरल करुन फिर्यादीच्या मुलीच्या तसेच फिर्यादीच्या स्त्रि मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले.
हा प्रकार (दि. ४) रोजी १.४४ वा. गोवींद निवास, गजानन महाराज संस्थान समोर, तापकिर नगर, देहुफाटा येथे घडला. ४२ वर्षांच्या महिला फिर्यादी यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी आरोपी सतीष मोतीराम राठोड (वय २३ वर्षे, रा. आण्णा भाउ साठे नगर, डुडुळगाव), मोबाईल क्रं. धारक यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. दिघी पोलीस पुढील तपास करीत आहेत.