न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ५ नोव्हेंबर २०२२) :- पुणे, पिंपरी चिंचवड शहर आणि जिल्ह्यातून दोन वर्षाकरीता तडीपार केलेल्या आरोपीने आदेशाचा भंग करीत शहरात प्रवेश केला. पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी आरोपीला ताब्यात घेत असताना आरोपीने पोलिसांशी झटापट व दमदाटी करीत सरकारी कामात अडथळा केला.
ही घटना (दि. ३) रोजी रात्री १०.१० वाचे सुमारास संग्रामनगर झोपडपट्टी, पत्राशेडच्या आडोश्यास, अंकुश चौकाजवळ, ओटास्कीम, निगडी येथे घडली. निगडी पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई नितीन बिभीषण सपकाळ यांनी फिर्याद दिली असून पोलिसांनी आरोपी शाहीद साजीद शेख (वय २७ वर्षे रा. संग्रामनगर झोपडपट्टी अंकुश चौकाजवळ, ओटास्कीम, निगडी) याला अटक केली आहे. निगडी पोलीस पुढील तपास करीत आहे.