न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ५ नोव्हेंबर २०२२) :- संगणमताने, पुर्वनियोजित कट रचुन स्वतः डॉक्टर असल्याचा बनाव रचला. नोंदणीकृत हॉस्पीटल व रिचर्स इन्स्टीटयुट असल्याची खोटी माहिती के.एल.ई. युनिव्हरसिटीच्या मॅनेजमेंटला दिली. त्यांचा विश्वास संपादन करून संस्थेसोबत अॅग्रीमेंट केले.
आरोपीने त्याचा हेतू साध्य करण्यासाठी सप्लीमेंटरी अॅग्रीमेंटवर फिर्यादी संस्थेचे रजिस्टर व्ही.ए. कोटीवाले व साक्षिदार डॉ. व्ही. डी. पाटील यांची बनावट सही करीत संस्थेचे फसवणुक केली. अॅग्रीमेंट रद्द करण्यासाठी फिर्यादीकडे ५ कोटींची खंडणी मागितली.
ही घटना मार्च २०२१ ते आजपर्यंत ग्लोबल हॉस्पिटल, सेक्टर नं. १, इंद्रायणीनगर, भोसरी येथे घडली. ४१ वर्षीय महिला फिर्यादी यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. आरोपी संतोष भिमराव पारवे पाटील (वय ४२, रा. फ्लॅट नं. ७०१, सिध्दी टॉवर, दापोडी), आरोपीची पत्नी यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
















