न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ७ नोव्हेंबर २०२२) :- ब्युटीशीअन पार्लरच्या कोर्ससाठी फिर्यादी तरुणी या रस्त्यावरून जात असताना आरोपी हा त्याची ज्युपीटर (क्र. १०३४ पुर्ण नंबर आठवत नाही) वरुन आला. आरोपीने फिर्यादीला रस्त्यात अडवुन फिर्यादीच्या हाताला धरुन बाजुला नेले.
‘ तु माझ्याशी का बोलत नाहीस? ‘ म्हणुन फिर्यादीच्या थोबाडीत मारले. त्यामुळे फिर्यादीच्या मनास लज्जा उत्पन्न झाली. त्यावेळी फिर्यादी ओरडले असता शिवीगाळ करुन फिर्यादीच्या घरच्यांना जिवे मारण्याची धमकी दिली आणि त्यांच्या गाडीवरुन पळुन गेला.
हा प्रकार (दि. ३) रोजी २ च्या सुमारास कुटे फॉर्म्युन बिल्डींगच्या बाजुच्या रोडवरुन जात असताना घडला. पिडीत २५ वर्षीय फिर्यादी महिलेने देहुरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी आरोपी दिपक सुर्यकांत गावडे (रा. साईनगर, गहुंजे) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. देहूरोड पोलीस पुढील तपास करीत आहेत.
















