न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ७ नोव्हेंबर २०२२) :- टेलीग्रॅम अॅपमधील युजर आय डी @Himurafx Official11 या अनोळखी व्यक्तीने फॉरेक्समध्ये ऑनलाईन गुंतवणुकीसाठी फिर्यादीला प्रवृत्त केले. जादा नफा मिळण्याचे आमिष दाखवले.
आरोपीच्या कॅनेरा बँक अकाऊट नंबर 6823101001127 व IFSC CODE नं CNRB0006823 वर फिर्यादीला वेळोवेळी ऑनलाईन पैसे पाठविण्यास सांगितले. फिर्यादीने गुंतवणुक केलेल्या रक्कमेसह अनोळखी व्यक्तीने फिर्यादी यांची एकुण रु. १०,१७,६३१ रुपयांची ऑनलाईन फसवणुक केली.
हा प्रकार (दि. २७/८/२०२२) रोजी सायं. ६. १० ते (दि. ०६/०९/२०२२) रोजी सकाळी ९.२१ वा चे दरम्यान (ऑनलाईन) गहूंजे येथे घडली. फिर्यादी संदीप बाबुभाई पटेल (वय ३७ वर्षे, रा. सी.२०७, मंत्रा २४ वेस्ट, गहुंजे) यांनी शिरगाव पोलिसात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दखल केला आहे. शिरगाव पोलीस पुढील तपास करीत आहेत.















