न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ८ नोव्हेंबर २०२२) :- राजगुरुनगर येथील एसटी डेपो महामंडळाची एसटी बस (एमएच ४० एन ९५०१) यावरील बसचालक व फिर्यादी वाहक हे चाकण ते देशमुखवाडी या मार्गे एसटी बसमधुन चार प्रवाशांसह प्रवास करीत होते. दरम्यान बसच्या पाठीमागुन स्कुटीवरून (एमएच १४ जेएन १४६५) पुढे येऊन आरोपीने बसच्यासमोर स्कूटी आडवी घातली. बस पुढे जाण्यास प्रतिबंध केला.
त्यावेळी फिर्यादी हे बसमधुन खाली उतरुन स्कुटी चालकास बसला स्कुटी आडवी का लावली? असे विचारले. त्यावरून आरोपीने फिर्यादी यांना शिवीगाळी केली. बसच्या समोरील काचेचे वायपर तोडुन नुकसान केले. वायफरने फिर्यादीच्या डोक्यावर मारत असताना आरोपीच्या करंगळी जवळील बोटास दुखापत करून माझ्या पोरांना बोलावुन आणुन मग तुम्हाला दाखवतो, अशी धमकी दिली. फिर्यादी हे त्यांचे कायदेशीर कर्तव्य पार पाडीत असताना त्यांचे कर्तव्य पार पाडु नये म्हणून प्रतिबंध केला.
हा प्रकार (दि. ६) रोजी रात्री ७.३० वाजता शिवेगांव जवळ, ता खेड जि पुणे येथे घडला. एसटी बसचे वाहक फिर्यादी संजय लिंबा भोकटे (वय ३९ वर्षे, रा. खरपुड ता. खेड जि. पुणे) यांनी चाकण पोलिसात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी आरोपी कुलदिप कीसन शिंदे (वय २६ वर्षे रा. गडद ता.खेड जि.पुणे) याच्यावर गुन्हा दाखल करीत त्याला अटक केली आहे. चाकण पोलीस पुढील तपास करीत आहेत.















