न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ८ नोव्हेंबर २०२२) :- निवडणूक आयोगाकडून छायाचित्र मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम घेण्यात येत आहे. त्या अंतर्गत मतदारांची प्रारूप मतदार यादी बुधवारी (दि. ९) प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यापूर्वी दोन दिवस मतदार यादीत नावे नोंदविण्याची संधी आहे.
मतदार यादीत नाव आहे किंवा नाही हे तपासण्यासाठी www.nvsp. in या संकेतस्थळावर किंवा व्होटर हेल्पलाइन या मोबाईल अॅपवर संपूर्ण नाव, वय, लिंग, राज्य, जिल्हा आणि विधानसभा मतदार संघ ही माहिती भरल्यानंतर समजेल.















