न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ नोव्हेंबर २०२२) :- दिवंगत पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंनी स्वातंत्र्य प्राप्ती नंतर देशाच्या भावी पिढीच्या उज्ज्वल भविष्यासाठी शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक विकासासाठी धोरण निश्चित केले. ते भारताचे भाग्य विधाते होते, असे प्रतिपादन पिंपरी चिंचवड शहर काँग्रेसच्या पर्यावरण सेलचे अध्यक्ष अक्षय शहरकर यांनी केले.
पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त आकुर्डी रेल्वे स्टेशन जवळ गुरुद्वारा रस्त्यालगत शहरकर यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी अमर नाणेकर महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश सरचिटणीस पर्यावरण विभाग, अशोक काळभोर महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश सचिव पर्यावरण विभाग, मीना गायकवाड, मंगेश मोरे, सिद्धांत रिकीबे, देवानंद ढगे ,अमोल तेलंगे, विशाल म्हेत्रे, मनोज ढकोलिया, सचिन धावरे, प्रकाश पवार आदी उपस्थित होते.


















