न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ नोव्हेंबर २०२२) :- सामानाची ने-आण करण्यासाठी फिर्यादी यांनी मित्राची कार आणली होती. कारच्या डाव्या बाजुची काच फोडुन अज्ञात चोरट्यांनी फिर्यादी यांचे ६६००० रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने व २०,००० रोख रक्कम त्यामध्ये ५००, १०० व ५०, २० अशा भारतीय चलनाच्या नोटा असलेली फिर्यादी यांची मौल्यवान वस्तुची बॅग चोरून नेली आहे.
ही घटना (दि. १२) रोजी दुपारी १२.१५ ते १२.३० वा चे सुमारास घडली. फिर्यादी अजिंक्य बळवंत पैठनकर (वय ३४, रा. प्लॅट नं २, बिल्डिंग ३९, स्किम नं १२, अंकुष बारोडे मळा, यमुनानगर निगडी, सध्या ए ३०२, साई हौसिंग सोसायटी किवळे, देहुरोड) यांनी देहुरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. देहुरोड पोलीस पुढील तपास करीत आहेत.
















