न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ नोव्हेंबर २०२२) :- पतीसोबत पायी जात असताना आरोपीने फिर्यादी विवाहित महिलेला ” तु मला आवडते, तु माझेशी लग्न करणार की नाही, तु तुझ्या पतीला सोडुन दे, नाहीतर काय होईल बघ ” अशी धमकी दिली. फिर्यादी महिलेचा पाठलाग करुन विनयभंग केला.
फिर्यादीसह त्यांच्या पतीला लाकडी दांडक्याने जबर मारहाण करुन गंभिर दुखापत केली. हा प्रकार (दि. १२) रोजी २.३० वा. चे सुमारास बेंद्र ज्वेलर्स दुकानासमोरील रस्त्यावर चिखली येथे घडला.
फिर्यादी पिडीत महिलेने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी आरोपी धर्मराज संतोष पवार (वय अं. २५ वर्ष, रा. साने चौक, चिखली) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. चिखली पोलीस पुढील तपास करीत आहे.
















