न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ नोव्हेंबर २०२२) :- चिंचवडमधील कमला एज्युकेशन सोसायटीच्या प्रतिभा ज्युनिअर कॉलेजने बाल दिनाचे अवचित्य साधून स्टुडन्ट वेल्फेअर कमिटी अंतर्गत “एक हात मदतीचा ” हा उपक्रम राबविला.
यासाठी प्राध्यापक जास्मिन फरास व प्राध्यापक तृप्ती बजाज यांनी पुढाकार घेऊन विकास अनाथ आश्रम चिखली येथे भेट दिली होती. यावेळी ज्युनिअर कॉलेजच्या उप प्राचार्य डॉ. वनिता कुऱ्हाडे, समन्वयीका प्रा. सुनिता पटनाईक व समनवयिका प्रा. जास्मिन फरास, प्रा.तृप्ती बजाज, प्रा. समिता शिंदे, प्रा.रघुनाथ ताम्हाणे, प्रा.चिन्मय जैन आणि ११ वी १२ वी चे अनेक विद्यार्थी उपस्थित होते.
” एक हात मदतीचा निराधारांसाठी ” या उपक्रमा अंतर्गत विद्यार्थी व प्राध्यापकांनी धान्य डाळी, अन्य किराणा, शीतपेय, खाऊ, आणि अनेक गरजू वस्तू अशा विविध स्वरूपात या अनाथ चिमुकल्यांना मदतीचा हात दिला. या उपक्रमास संस्थेचे सचिव डॉ दीपक शहा व प्राचार्य डॉ बाबासाहेब सांगळे यांनी प्रोत्साहन दिले.