- हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त काळेवाडीतील शिवसैनिकांचा प्रण…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ नोव्हेंबर २०२२) :- आपल्या विचारांनी प्रत्येक मराठी आणि हिंदु माणसाच्या मनात स्वाभिमानाची धगधगती मशाल पेटविणाऱ्या हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांनीच आमच्यासारख्या लाखो शिवसैनिकांना निष्ठा शिकवली. मग ज्या माणसाने निष्ठा शिकवली त्याच्याशी गद्दारी करण्याचा प्रश्नच येत नाही. शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही बाळासाहेबांचे कट्टर एकनिष्ठ शिवसैनिकच राहणार आणि हीच खरी बाळासाहेबांना आदरांजली असेल, अशा शब्दांत पिंपरी चिंचवड शहर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपशहरप्रमुख हरेश नखाते यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या १० व्या पुण्यतिथीनिमित्त काळेवाडी-रहाटणी विभागाच्या वतीने त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना आदरांजली वाहण्यात आली. उपशहरप्रमुख हरेश नखाते यांच्या जनसंपर्क कार्यालयात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी विभाग प्रमुख गोरख पाटील निलंगेकर, सामाजिक कार्यकर्ते एकनाथ मंजाळ, उपविभाग प्रमुख हनुमंत पिसाळ, पिंपरी विधानसभा संघटक गणेश आहेर, उपसंघटक गणेश पाटोळे, शाखाप्रमुख नरसिंग माने, सावता महापुरे, दत्ता गिरी, सुभाष लोंढे, विकास काजळे, काळेवाडी जेष्ठ नागरिक संघाचे
सदस्य तसेच रहाटणी-काळेवाडी विभागातील तमाम शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी आदरांजली वाहताना उपशहरप्रमुख हरेश नखाते म्हणाले की, तमाम शिवसैनिकांचे दैवत असलेल्या बाळासाहेबांनी आपल्या शेवटच्या दसरा
मेळाव्यातील भाषणात शिवसैनिकांना एक वचन मागितले होते. ते म्हणजे उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना साथ दया. आम्ही बाळासाहेबांच्या या
वचनाला शेवटच्या श्वासापर्यंत बद्ध आहोत आणि जोपर्यंत जीवात जीव असेल तोपर्यंत आम्ही उद्धव ठाकरे यांच्यासोबतच एकनिष्ठ राहणार आहोत, अशी अशी शपथ यावेळी उपस्थित शिवसैनिकांनी बाळासाहेबांना स्मरून घेतली.