न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ नोव्हेंबर २०२२) :- महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा, विमुक्त जाती व भटक्या जमाती विद्यानिकेतन परीक्षा, आदिवासी विद्यानिकेतन परीक्षा, शासकीय विद्यानिकेतन परीक्षा १२ फेब्रुवारी रोजी घेण्यात येणार आहे. परीक्षेचे अर्ज उपलब्ध करून देण्यात आले असून, नियमित शुल्कासह अर्ज भरण्यासाठी १५ डिसेंबरची मुदत आहे.
परीक्षा परिषदेच्या आयुक्त शैलजा दराडे यांनी शिष्यवृत्ती परीक्षांच्या अधिसूचनेसह परीक्षेचे वेळापत्रक बुधवारी प्रसिद्ध केले. अधिसूचनेनुसार राज्यातील सर्व जिल्ह्यात एकाच दिवशी १२ फेब्रुवारीला परीक्षा घेण्यात येईल. परीक्षा अर्ज ऑनलाइन पद्धतीने भरायचा आहे.
त्यात १५ डिसेंबरपर्यंत नियमित शुल्कासह, १६ डिसेंबर ते २३ डिसेंबर या कालावधीत विलंब शुल्कासह, तर २४ डिसेंबर ते ३१ डिसेंबर या कालावधीत अतिविलंब शुल्कासह अर्ज करता येईल. ३१ डिसेंबरनंतर अर्ज भरता येणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले.
अधिक माहितीhttps://www.mscepune.in/ या संकेतस्थळावर देण्यात आली आहे.