- पिंपरीतील घटना; पोलिसांनी तरुणाला ठोकल्या बेड्या…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ नोव्हेंबर २०२२) :- राहत्या घराच्या बाथरुममध्ये फिर्यादी महिला अंघोळीसाठी गेल्या. त्यावेळी आरोपीने फिर्यादी महिलेच्या बाथरुमच्या खिडकीत बाहेरच्या बाजून मोबाईल फोन ऑन करून ठेवून मोबाइलमधून चोरून चित्रण केले. त्यामुळे फिर्यादी महिलेच्या मनास लज्जा उत्पन्न होऊन तिचा विनयभंग झाला, असे फिर्यादीत नमूद आहे.
ही घटना पिंपरी येथे बुधवारी (दि. १६) सकाळी सव्वासहाच्या सुमारास घडली. पीडित महिलेने बुधवारी (दि. १६) पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी नितीन शाम शिंदे (वय १९, रा. नेहरूनगर, पिंपरी) याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पिंपरी पोलीस पुढील तपास करीत आहेत.