- न्यायालयाकडून आरोपींना पाच दिवसांची पोलिस कोठडी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ नोव्हेंबर २०२२) :- नेरेत द व्हिलेज रेसिडेन्सीमध्ये फ्लॅट धारकांना फ्लॅट देतो, असे आमिष दाखवून एकूण ३५ जणांची आर्थिक फसवणूक करण्यात आली. हे सर्व फ्लॅट धारक उच्चशिक्षित असल्याची माहिती पुढे येत आहे. २०१८ मध्ये नेरेत ही सोसायटी उभारण्यात आली तेव्हा फ्लॅट धारकांना खरेदी खत तयार करून दिलं, पण प्रत्येक्षात फ्लॅटचा ताबा न देताच मुख्य आरोपी प्रतीक आगरवाल पसार झाला होता. त्याने ४ कोटी १४ लाख २७ हजारांची आर्थिक फसवणूक केली होती. त्या सोसायटीच्या इमारतीचं बांधकाम देखील अर्धवट झाल्याचं समोर आलं आहे.
२०१८ मध्ये या प्रकरणी हिंजवडी पोलिसात मनमिंदरसिंग वय- ५५ पुणे यांनी तक्रार दिली होती. त्यानुसार, न्यायालयाने अटकपूर्व जामीन रद्द करत प्रतीक आगरवालला हजर होण्यास सांगितले होते. मात्र, न्यायालयाचा अवमान करत तो पसार झाला होता. अखेर दोन वर्षांनी प्रतीकला पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाच्या गुंडा विरोधी पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. आरोपींना न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली असून आणखी काही जणांची फसवणूक झाल्याचं समोर येऊ शकत अस गुंडा विरोधी पथकाचे प्रमुख हरीश माने यांनी सांगितलं आहे.
रांची आणि हैद्राबाद येथे आरोपी बांधकाम व्यवसायिक प्रतीक हा प्रस्थ बसवण्याचा मार्गावर होता. त्याअगोदरच रेल्वे प्रवास करणाऱ्या प्रतीकला नाशिक रेल्वे स्थानकातून अटक करण्यात आली. प्रतीक आगरवाल पुणे, असे मुख्य आरोपीचे नाव आहे. तर, किरण, आणि विनय अशी इतर साथीदारांची नावे आहेत. त्यांना न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.