न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ नोव्हेंबर २०२२) :- पुणे- मुंबई महामार्गावरील दापोडी बीआरटी बस स्टॉप जवळ फिर्यादीचे चुलते हे रस्ता ओलांडत होते. त्यावेळी भरधाव आलेल्या वाहनाने त्यांना जोरात धडक दिली. त्यात गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला.
अपघातानंतर आरोपी वाहन चालक घटनास्थळी न थांबता पसार झाला. नंदकुमार विठोबा साखरे (वय ५५) असे मृत्यू झालेल्या पादचाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी ऋषिकेश इंद्रभान साखरे (वय २६, रा. दापोडी) यांनी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. भोसरी पोलिस अधिक तपास करीत आहेत.
















