न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ नोव्हेंबर २०२२) :- पत्नीचे आरोपीशी प्रेमसंबंध होते. दोघांच्या वयातील फरकामुळे त्यांना लग्न करता आले नव्हते. त्यामुळे महिलेने फिर्यादी पतीसोबत लग्न केले. लग्नानंतर देखील तिने प्रेमसंबंध सुरूच ठेवले.
प्रियकराने एका अनोळखी महिलेला फिर्यादीस फोन आणि मेसेज करायला सांगून फिर्यादीचे लग्न मोडण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, फिर्यादीची पत्नी सोन्याचे मंगळसूत्र, गंठण, अंगठी, कानातले टॉप्स व रोकड असा ४९ हजार ८०० रुपयांचा ऐवज घेऊन प्रियकरा सोबत पळून गेली.
३१ वर्षीय पतीने वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार त्याची पत्नी (वय ३१) व तिचा प्रियकर तौफिक रियाज राही (वय ५९) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
















