न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ नोव्हेंबर २०२२) :- घराचे लोखंडी सेफ्टी डोअरचे लॉक उघडून अज्ञात इसमाने आतमध्ये प्रवेश केला. बेडरुममधील लोखंडी कपाटातील लॉकरचा पत्रा उचकटुन त्यामधील ४०,००० रोख रक्कम, १,५५,००० रुपये किमतीचे साडेपाच तोळे सोने, ५००० रुपयांचे चांदीचे दागिने, असा एकूण दोन लाखांचा ऐवज घरफोडी करून चोरून नेला आहे.
ही घटना (दि. २०) रोजी दोन ते रात्री १०.३० च्या दरम्यान नढेनगर येथे घडली. याप्रकरणी समीर हकीम खान (वय ३६ वर्षे, रा. गणेश वंदना प्लाझा, फ्लॅट नं. २, स्नेहा कॉलनी रोड, नढेनगर, काळेवाडी) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. वाकड पोलीस पुढील तपास करीत आहेत.