- पतीला तरुणाची पाहून घेण्याची धमकी; भोसरीतील प्रकार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ नोव्हेंबर २०२२) :- इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत असताना फिर्यादी व आरोपींची भेट होत ते ऐकमेकांचे मित्र-मैत्रीण झाले. दरम्यान आरोपीने फिर्यादीवर एकतर्फी प्रेम केले. आरोपीने त्याच्या मोबाईलवरुन फिर्यादी महिलेच्या मोबाईलवर वारंवार फोन केला. फिर्यादीसोबतचे फोटो आणि ” माझे तुझ्यावर खुप प्रेम आहे, ती माझ्याशिवाय दुस-या कोणाचीच होवु शकत नाही ”, असा मजकूर आरोपीने फिर्यादीच्या व्हॉटसअपव्दारे पाठवला. फिर्यादीचे पती तसेच फिर्यादीचे आई-वडील यांना बोलावून त्यांच्यासमोर आरोपीने फिर्यादी महिलेला मिठी मारली. स्त्री मनास लज्जा निर्माण होईल असे वर्तन केले.
फिर्यादीचे पती व आई वडिलांनी फिर्यादी महिलेला आरोपीच्या ताब्यातुन सोडविले. आरोपीने फिर्यादीस व तिच्या पतीला ‘ तुम्हाला सोडणार नाही, तुम्हाला पाहुन घेईन ‘ अशी धमकी दिली. हा प्रकार (दि. १२/११/२२ रोजी ११.४० वा ते दि. २२/११/२०२२ रोजी रात्री ९.०८ ते १०.३०) च्या सुमारास जय गणेश साम्राज्य चौक, स्पाईन रोड, भोसरी येथे घडला.
२७ वर्षीय फिर्यादी महिलेने एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी सागर शालिग्राम भांरबे (वय २९ वर्षे, रा. व्दारा शितल गोपाळ ढगे, धनकवडी, कात्रज) याला पोलिसांनी अटक केली आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस पुढील तपास करीत आहेत.
















