- प्रभाग क्र. २ जाधववाडी-बालघरे वस्तीत स्वच्छतेविषयक जनजागृती…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ नोव्हेंबर २०२२) :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या क क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने प्रभाग क्र. २ जाधववाडी येथील बालघरे वस्ती येथे स्वच्छ सर्वेक्षण २०२२-२३ च्या अनुषंगाने स्वच्छतेविषयी जनजागृतीबाबत रॅलीचे आयोजन सकाळी १० ते १२ या वेळेत करण्यात आले होते. दैनंदिन निर्माण होणा-या कच-याचे वर्गीकरण ओला व सुका कचरा या स्वरूपातच करून पालिकच्या कचरा गाडीमध्ये द्यावा, असे आवाहन नागरिकांना करण्यात आले. प्लॉस्टिक बंदीबाबत जनजागृतीपर माहिती देण्यात आली.
” स्वच्छतेचे दोन रंग; हरा गिला सुका निला, ” थोडीतरी ठेवा जाण; सार्वजनिक ठिकाणी होणार नाही घाण ”, तसेच ” प्लास्टिक हटवा, शहर वाचवा ” याबाबत संदेश देण्यात आले. उपक्रमात विशाल बालघरे, संभाजी बालघरे, दिपक ठाकूर व परिसरातील नागरिक बंहुसंख्येने उपस्थित होते. क क्षेत्रीय कार्यालयाचे क्षेत्रीय अधिकारी तथा सहा. आयुक्त अण्णा बोदडे यांनी स्वच्छतेविषयक व प्लॅस्टिक बंदीविषयक तसेच कचरा विलगीकरणाबाबत आपले मनोगत व्यक्त करताना उपस्थितीतांना आपले पिंपरी चिंचवड शहर स्वच्छ ठेवण्सया सहकार्य करावे, असे आवाहन केले.
क क्षेत्रीय कार्यालयाचे सहा.आरोग्याधिकारी तानाजी दाते, मुख्य आरोग्य निरीक्षक राजेंद्र उजिनवाल, प्रभाग क्र २ चे सहा. आरोग्य निरीक्षक संदीप राठोड व अमोल घुसर तसेच मनपा अधिकारी आणि कर्मचारी तसेच परिसरातील नागरिकांनी सहभाग घेऊन कार्यक्रमास उत्स्फुर्त प्रतिसाद दिला.
















