न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ नोव्हेंबर २०२२) :- कंपनीतून घरी जाण्यासाठी फिर्यादी रिक्षात बसले. रिक्षा चालकाने फिर्यादीला इच्छित स्थळी न नेता कन्ट्रक्शन साईटजवळ नेले.
बळजबरीने फिर्यादीकडून १०,००० रुपये किमतीचा सॅमसंग कंपनीचा मोबाईल, २०,००० चा अॅपल कंपनीचा मोबाईल व ३०,००० चा लॅपटॉप, असा एकूण ६०,००० रुपये किमतीच्या वस्तू नेल्या आहेत.
ही घटना (दि. २३) रोजी ६:५० वा दरम्यान टीप टॉप हॉटेलच्या पाठीमागील कन्ट्रक्शन साईटजवळ, वाकड येथे घडली. रघु वेंकटेशवल्लु पसफुलेटी (वय २५ वर्षे, रा. स्टाझा लिव्हींग टालीन हाऊस, पी.जी जॉय व्हॅली रोड, विलास जावडेकर स्कीमजवळ, हिंजवडी, फेज १) यांनी अनोळखी रिक्षा चालक व त्याच्या साथीदाराविरोधात फिर्याद दिली आहे. हिंजवडी पोलीस पुढील तपास करीत आहेत.
















