न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ नोव्हेंबर २०२२) :- महाबळेश्वर येथे नुकताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्योजक गणेश राऊत यांना युवा उद्योजक पुरस्कार मिळाला. त्यानिमित्त चाकण MIDC उद्योजक संघटनेकडून त्यांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी, ज्येष्ठ उद्योजक कदम, संचालक शांताराम ताम्हाणे, खजिनदार किसन गायकवाड, सचिव निवास माने, संचालक प्रवीण शिंदे यांच्या हस्ते गणेश राऊत यांचा सन्मान करण्यात आला. गणेश राऊत हे चाकण MIDC उद्योजक संघटनेचे सभासद म्हणून कार्यरत आहेत.
आर्वी येथील गणेश राऊत यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये उच्च शिक्षण घेत, स्वकर्तुत्वावर व्यवसायामध्ये घेतलेली गरुड झेप ही इतर तरुणांना प्रेरणादायी ठरण्यासारखीच आहे, असे गौरवोदगार चाकण MIDC उद्योजक संघटनेचे अध्यक्ष जयदेव अक्कलकोटे यांनी काढले.