न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ नोव्हेंबर २०२२) :- जबरदस्तीने महीला आरोपी पिडीत ३ महीलांकडून वेश्याव्यवसाय करुन घेत असल्याची माहिती हिंजवडी पोलिसांना मिळाली. पोलिसांनी बुधवारी (दि. २३) रोजी रात्री ८. ३० च्या सुमारास मारुंजीतील शिंदेवस्ती येथे छापा मारून महिलेला ताब्यात घेतले.
आरोपीने पीडित महिलांना पैशांचे अमिष दाखवून त्यांना वेश्या व्यवसायासाठी प्रवृत्त केले. त्यातून मिळालेल्या रकमेतून स्वतःची उपजिवीका भागवली. पोलिसांनी १२,५२० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. हिंजवडी पोलिसांनी महिला आरोपीवर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.
















